top of page
Writer's pictureDr.Ramesh Suryawanshi

तुम्ही आत्महत्या करु नका

आपल्या व परिसरातील अनुभवांवर आधारीत लिहावे. कुठेतरी ती डायरी वजा नोंद असावी  आपले अनुभव इतरांना मार्गदर्शक ठरावेत मात्र चांगल काय अन वाईट काय  हे ज्याला त्याला अनुभवातून ठरवू द्यावे असे वाटू लागले  . अर्थात कोणतीही कविता, नाटक, कादंबरी अथवा कोणतीही साहित्यिक कृती ही पुर्णतः काल्पनिक असूच शकत नाही  त्या कथानकांला अनुभवांचे अवगुंठण हे असतेच  नाटक,सिनेमा,कांदबरी सादर करतांना कुणी कितीही म्हटले ''सर्व घटना व पात्रे ही काल्पनिक आहेत'', तरी ती साहित्यकृती ही जीवनाचे प्रतिबिंब असते  वाचणाराला किंवा पाहणाराला त्यात आपल्या किंवा परिसरातल्या जीवनाचे प्रतिबिंब आढळते  जगाच्या पाठीवर असे लोक, असे अनुभव हे कुठेनाकूठे असणारच! तसे नसते तर नाटक, सिनेमा, कादंबरी, कथा कुणी वाचल्या अगर पाहिल्या असत्या का? ती कलाकृती त्याला भावते  तिच्यातील पात्र तो स्वतःमध्ये किंवा आजूबाजूला पहात असतो  म्हणून तो ती पाहतो, वाचतो,किंवा ऐकतो  त्यातूनच मग हामरशिया किंवा कॅथरसीस या संकल्पनापुढे आल्यात.  गावागावात आपणाला कादंबरीतील सारी पात्रे आजूबाजूला आढळतातच   

              या कोरानासाथीच्या काळात,सर्वत्र लाॅकडाऊन असतांना टिव्ही अन माबाईलही जगाच्या संपर्काची साधने.  त्यात काही  सिनेकलावंताने गळफास घेवून जीवन संपवले ही मन हेलावून टाकणा-या बातम्याकानी  आल्या  पाठोपाठ अनेक आत्महत्यांच्या बातम्याही कानी पडल्या . खून की आत्महत्या हा ही वाद बराच चिघळला.  कारण अनेक वेळा समोरच्याचा काटा काढला जातो अन आत्महत्येचा बनावही केला जातो.  त्यावर अनेक प्रतिक्रियाही आल्यात.  त्या प्रतिक्रियांचा सूर हा व्यवस्थेच्या विरोधातील होता. या व्यवस्थेनेया कलाकाराचा जीवघेतला, त्याला आत्महत्या करायला भाग पाडले  अर्थात या प्रतिक्रिया सुद्धा याच व्यवस्थेतून, त्याच क्षेत्रातील मान्यवराच्या होत्या.  हा असला छळवाद केवळ सिनेसृष्टितच नाही तर गायकी क्षेत्रात वा संगीत क्षेत्रातही होतेा. अशाही काही बातम्या आल्यात. मलाया बातम्यांनी राहावले नाही    केवळज्ञसिनेक्षेत्र किंवा सगीतक्षेत्र येथेच हे प्रस्थापित वाट अडवितात, छळतात, रॅगीग घेतात किंवा वाटेतून परत फिरविण्याचा प्रयत्न करतात असे नाही  तर हे असले प्रकार सर्वच क्षेत्रात पहावयास मिळतात   आपणावरही अनेक असे प्रसंग आलेच होते की !

              मग या आत्महत्या का होतात ?  अपेक्षां किंवा ज्याला आपण एक्स्पेक्टेशन्स असंही म्हणतो. आपल्या मुलाने, भावाने, बायकोने, पतीने, आपल्या आवडत्या नायकाने असं असं हे केलं पाहिजे, अशा वेडगळ अपेक्षा बाळगनं अन त्यांचा सततचा लकडा त्याच्या पाठीमागे लावून त्याला हैरान करुन सोडनं .  प्रत्येकाचे जीवन वेगळे असते  . प्रत्येकाच्या मनाची ठेवण ही वेगळी असते . आवड निवडही वेगळी असते . त्यानुरुप तो वागला तर त्याला आनंद मिळतो.  मात्र त्याच्या पासून अपेक्षा बाळगणारे त्याला तसे वागू देत नाहीत.  प्रत्येकाला आपली हुरहून्नर सोडून देवून व्यवस्थेला शरण येण्यास भाग पाडतात.  त्याने आपल्या म्हणण्या प्रमाणे वागावे, आपण सांगू ते करावे, त्याच कोर्सला जावे, एवढेच गुण मिळवावेत,हाच व्यवसाय निवडावा, किंवा याच मुलाशी वा मुलीशी लग्नाला तयार व्हावे इ इ . थोडक्यात अपेक्षा बाळगाणारे त्याला पाळीव प्राण्याप्रमाणे हक्क सांगून आपल्या अपेक्षा त्याचेवर थोपवतात. तसेच वागायला भाग पाडतात . अन हेच तर त्याला नको असते . त्याला तर स्वतःचे जीवन स्वतःच्या पद्धतीने जगावयाचे असते.  अन ही व्यवस्था त्याला जीवन जगनं असह्य करुन सोडते . अन हे पिढ्यानं पिढ्या सुरुच राहते.  प्रत्येक ताठ व्यक्तीच्या जीवनात त्याला वाकविण्याचे सततचे प्रयत्न हे या व्यवस्थेकडून होतच असतात.  बहूतांश लोक या व्यवस्थेला शरण जातात . प्रवाहाच्या दिशेन जाऊन आपलं जीवन जगन सुकर करुन घेतात . तर काही ज्यांना व्यवस्थेलाही शरण जाता येत नाही अन स्वतंत्रही जगन अशक्य वाटतं ते आपलं जीवन संपवून घेण्याचा टोकाचा विचार करतात.  अन या आत्महत्या घडतात ! मला वाटते हा व्यवस्थेचा रॅगीगचा प्रकार आहे  अन तो सर्वच क्षेत्रांत दिसून येतो.  ही रॅगीग समोरासमोरची नसते  अंतर ठेवून असते. तो एक प्रकारचा मानसिक छळच असतो. 

              आणखी दुस-या प्रकारची अपेक्षा बाळगण्याचा प्रकारातूनही नैराश्य येते  मुलाने, सुनेने वा मुलीने आपणाला असे वागविले पाहिजे, हे दिले पाहिजे, ते केले पाहिजे ही अपेक्षा बाळगणे . स्वतःच्या किंवा इतरांच्या मुलाला किंवा मुलीला वाढवितांना , शिकवितांना किंवा नोकरी वा व्यवसायात स्थैर्य देतांना आपण खूप कष्ट घेतलेत ,आता त्याने किंवा तीने त्याची परतफेड केली पाहिजे, त्यासाठी असे वागले पाहिजे इ इ . अपेक्षा बाळगल्यात की अपेक्षाभंग हा होणारच! मग त्यातून नैराश्य हे येणारच. 'मुलासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करुन जमा केलेली संपत्ती त्याला देवूनही त्याने आपणाला म्हातारपणात असे वागवायला नको होते' असं वाटून नैराश्य येते.  आपण एवढी मेहनत केली , आयष्यपणाला लावले अन शेवटी हाती अपयश आले,  मी जे केले ते जगावेगळे केले, मोठे काम केले,अमूल्य असे केले म्हणून जगाने मला किंमत दिलीपाहिजे इ इ आशा बाळगणे व ती अपेक्षा पूर्ण न झाल्याने नैराश्य पत्करणे  आपणाला यशच यायला हवे होते ही अपेक्षा बाळगणे व अपयश आल्यावर नैराश्य येणे  अन ते नैराश्य जर टोकाचे आले तर ती वाट आत्महत्येकडे नेते  यासाठी कोणत्याही फळाची,फायद्या-तोट्याची  अपेक्षा न करता आपण कार्यरत रहाणे हे नैराश्य टाळण्यासाठी महत्वाचे आहे 

              जो इतरांहून वेगळ वागतो, विरोधी वागून आपली मते तो खोडू  पहातो, अन स्वतःची जनमानसात छाप पाडतो   त्याच्या वागण्याने प्रस्थापितांचे, पालकांचे , मालकांचे महत्व कमी होण्याचा, आपला हक्क कमी होण्याचा धोका अधिकचा असतो  या साठीच  एनकेन प्रकारेनं त्याचे खच्चीकरण करण्यासाठीही प्रस्थापितांची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत होते.  मग तो कुणाच्या अध्यात वा मध्यात असो किंवा नसो  तो रुळलेली चाकोरी सोडून, स्वतःच्या निर्णयानुसार, कुणाचेही न एकता, कुणालाही महत्व न देता, कुणाची हांजी हांजी न करता, स्वनिर्णयाने, स्वकतृत्वावर जगण्याची हिंमत दाखवितो ना ? मग हीच बाब या व्यवस्थेच्या टोळक्याला,बाॅसला ,व्यक्तीला ,पालकाला डोईजड वाटते  अन या प्रत्येक क्षेत्रातील हा नायक जर कमकुवत मनाचा असेल तर तो डिप्रेशन मध्ये जातो  नैरास्येच्या गगेऀत फसतो. त्याचा शेवट हा ठरलेलाच असतो ,  आत्महत्या ! मग ते क्षेत्र कोणतेही असो   व्यवस्था म्हणजे तरी काय ? या व्यवस्थेचे घटक आई,वडील, भाऊ, बहिण,शेजारी, शासनयंत्रणा, अधिकारी , एखादी संस्था, त्या संस्थेचे पदाधिकारी असं कुणीही असू शकतं ! ज्यांनीआपलं सार जीवन रुळलेल्या पाऊल वाटेने घालविलेलं असतं! अन त्यांना नव्या बाबी, स्वमताविरोधी असं काहीही नको असतं . 

              तर काही आत्महत्येची कारण ही समाजाने घालून दिलेली नितीमत्तेची चाकोरी, एखाद्या बाबीला दिलेली प्रतिष्ठा ही सुद्धा असू शकते . एखाद्याला समाजात काही बाबींसाठी ओळखले जात असेल अन त्याचे हातून त्या ओळखीला समाजाच्या मते काळीमा लागू शकते अशी जाणीव झाली तर ती व्यक्तीही आत्महत्येकडे प्रवृत्त होते.  एखाद्याच्या हातून पाप झाले तर त्याला दगडांनी ठेचून मारण्याच्या समाजाच्या मनावृत्तीचे दर्शन आपणाला येशूच्याकथेतून मिळते. आत्महत्याकरणाराने ही तोच प्रश्न स्वतःला विचारायला हवा जो येशूने दगडमारणा-या जनतेला विचारला होता  जर दोष देणारी व्यवस्थासुद्धा असा अपराध करुन चुकलेली आहे अन ती वर मानकरुन जगतेच आहे तर आपणच का म्हणून आत्महत्येचा मार्ग स्विकारावा ? अर्थात ही मते, असं निगरगठ्ठ होनं, हे समाजव्यवस्था ठासळायला लावणारी आहे असे काही समिक्षकांना वाटेल. मात्र त्यातही त्याचाही काही देाष नसेल कारण तेही या व्यवस्थेचाच एक भाग आहेत . त्यांनाही वाटते अशांना शिक्षाही झालीच पाहिजे, त्यांनी जीवन स्वतःहोऊन संपविलेच पाहिजे . अशावेळी त्यांना प्रत्यक्ष दगड हातात घेण्याची काहीही आवश्यकता भासत नाही.  त्याचं त्याच्या प्रती वागणं हेच दगडाहून अधीक प्रभावी ठरतं ! 

               या व्यवस्थेला कंटाळून व जीवनात हार मानून एखादा शेवटी आत्महत्या करतो.  मग त्यानंतर ही व्यवस्था चौकशी सुरु करते, आत्महत्येचं कारण काय असावं यावरची !  तो कर्जबाजारी असावा , कौटू्ऺबिक कलह असावा, किंवा प्रेमप्रकरण वा प्रेमभंग हे कारण असावं  इ इ.  असंच घडतं सर्वत्र . शेतकरी आत्महत्या करतो,   चौकशीत निष्कर्ष काढले जातात,  तो व्यसनाधिनहोता, त्याचेवर कर्जझाले होते इ इ.  मात्र त्याच्या आत्महत्ये मागचं या व्यवस्थेने केलेले कृत्य कधीच समोर येत नाही  . तो व्यसनाधीन होता अन त्याने आत्महत्या केली  त्याच्या व्यसनाधिनतेमागे असलेली व्यवस्था , त्याच्या आत्महत्ये मागील मुख्य कारण असलेली ही व्यवस्था ही आजवर चौकशीने नाकारलीच आहे.  शेतक-याच्या आत्महत्या या विषयावर अनेक चर्चासत्रे, लेख, संशोधन हे सुरुच असतं  मात्र  शेतक-यांना जीवन असह्य करुन सोडणा-या व्यवस्थेकडे कुणाचे लक्ष जात नाही.  मग या व्यवस्थेत तलाठी असेल , बॅन्क व्यवस्थापक असेल , तहसिलदार असेल , सावकार असेल ,शेजारचा बांध कोरणारा असेल, कुटूंबातील वडील, आई, भाऊ, बहिण, मुलगा , मुलगी किवा गावातील कुणी या व्यवस्थेचा भाग बनलेला व्यक्ती असेल ! हिस्सा मागणाराभाऊ, बहिण,वा दुसरा हिस्सेदार असेल.   मात्र अभ्यासक वा निष्कषाऀ पर्यत येणारे , हे सारं सारं दुर्लक्षून त्याचा फोकस असतो केवळ त्याच्या व्यसनाधिनतेवर  असो!

              मात्र जीवन हे अमूल्य आहे ते कुणीही संपवू नये . आपलं होउन होउन काय होणार ?  हा विचारच करण्याची बुद्धी जागृत होणे महत्वाचे असते . व्यवस्थेच्या या विरोधी घटकांना आयष्यभर लढा देवून जीवन जगण्याचा अनुभव हा काही वेगळाच असतो . त्यात एक वेगळं असं आत्मिक समाधान असतं  त्यासाठी प्रवाहाविरोधी जीवन जगण्याचं वेड अंगी यावं लागतं खडतर जीवन जगण्यासाठी स्वतःची मानसिक तयारी असावी लागते.  हांजीहांजी करुन जीवन सूकर करण्या ऐवजी सा-या तथाकथित सुखांना लाथ मारुन, तोट्यासह व्यवस्थेचा विरोध पत्करावा लागतो. अन या प्रवासात कुणाची साथ मिळेलच असेही नाही .जगाच्या दृष्टिने असा माणूस वेडा असतेा.  अन हे वेडच त्या मानसाची आत्मसंतूष्टी असते.  अन या आत्मसंतूष्टिसाठी तो सा-या तथाकथित इहवादी सुखांना तिलांजलीही देतो.  अन तोच खरं जीवनजगत असतो .अन तेच त्याचं खरं जगनं असतं . स्वाभिमानी अन आत्मनिर्भर !! 

              खरं म्हणजेआत्महत्येची काही सर्वसामान्य कारणही सुद्धा मांडली जातात  .अन सवांऀच्या मुळाशी नैराश्य असते.  अलिकडे यासाठी डिप्रेशन हाच शब्द ब-यापैकी रुढ झाला आहे . आता या नैराश्याची काही कारण म्हणजे आपल्यावर प्रेम करणा-या व्यक्तीची मैत्री तुटणे किंवा संपूष्टात येणे,आपली नोकरीवा व्यवसाय गमाऊन बसणे व कायमचा उत्पन्न स्त्रोत संपूष्टात येणे, इतर कर्जबाजारीपना सारखी आर्थिक कारणंही असू शकतात. आपली सामाजिक पत जाणे,  नातेसंबध किंवा उत्पन्नाचे मार्ग संपूष्टात येणे, शैक्षणिक वा प्रतिष्ठा टिकविण्यातील अपयश येणे, आपण स्थापित केलेल्या शारीरिक संबंधावर वा वैवाहिकसंबंधावर  कुटूंबाने किंवा समाजाने अस्विकृती दर्शविणे,सततचा अपमान किंवा सततची मानहाणी वा सततचे आथिऀक व मानसिक दडपण किंवा एखाद्या ख-या किंवा खोट्या गुन्ह्यात अटक होणे इ  कारणे आत्महत्येला कारणीभूत ठरु शकतात . आहे त्या परिस्थितीत आता सुधारणाच होणे शक्य नाही असा नैरास्यवाद येणे किंवा  दुर्धर अशा आजाराने जखडला जाणे किंवा त्या आजाराच्या असह्य अशा वेदना होणे. हे ही कारण आत्महत्येसाठी असू शकते.  एवढेच नाही तर समाजाने किंवा कुटूंबाने टाकलेला बहिष्कार किवा संपुष्टात आणलेले संबंध  अन त्यातून स्वतःला आलेला एकलकोंडेपणा, या सारखी कारणंही आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करतात . एवढच नाही तर केवळ  गंमत वा पैजेखातर म्हणून एखादे आव्हान स्विकारणे व इच्छा नसतांनाही अपघाताने मृत्यू ओढवणे हेही घडू शकते मात्र तो अपघतचअसतो आत्महत्या नव्हे

              जीवनातील सारी सुख अनुभवली , सारं ज्ञानप्राप्त केलं, जीवनात पुढे काय , पुढे काय या सा-या प्रश्नांची उत्तरं मिळालीत . आपण सारं काही जगून मोकळ केलय , आता नवं जगण्यासारखं काहीही  शिल्ल्क नाही  असं वाटायला लागून नैराश्य येणे व जीवनाचा कंटाळा येणं हेही मोठ कारण आत्महत्येस कारणीभूत ठरतं  

               आपला जोडीदार हा आपणाशी प्रामाणिक नाही असा संशय मनात घर करुन बसणे, किंवा तशी वास्तवता लक्षात येणे  आपल्या पतीचे किंवा पत्नीचे दूस-याशी शरीरसंबंध आहेत हे लक्षात येणे, जोडीदाराने आपणाला फसविले अशी जाणिव निमाऀण होणे व त्यातून नैराश्ययणे  आपल्याला आपल्याच जवळच्या आप्तांनी फसविलेआहे हे लक्षात येऊन नैराश्य येणे, आपल्या मुलीने किंवा मुलानेकाही तारुण्यात काही  निर्णय घेतला किवा तसे वागला अन तो आपणाला नाही आवडला तरीही नैराश्य येते.  रागाच्या भरात आपण चुकीचे वागलोत तसं वागायला नको होते ही भावनाही नैराश्याकडे नेते . अशा प्रकारची अनेक कारणे आत्महत्येसाठी प्रवृत्त करतात  थेाडक्यात नैराश्य आले म्हणजे डिप्रेशन मध्ये माणूस गेलाकी तो आत्महत्येसाठी प्रवृत्त होतेा . 

              आत्महत्येचा विचार करणा-याचे समुपदेशन करणारा, त्याच्या मनातील चलबिचल समजून घेणारा असा कुणीतरी त्याला भेटणे आवश्यक असते.  जेणेकरुन तो आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त होईल  यासाठी अशा मानसिक असंतुलनाच्या अवस्थेत असतांना अशा व्यक्तीने आपलं मन कुणाजवळ तरी मोकळेकरणे आवश्यक असते  मग ती व्यक्ती पती असेल, किंवा पत्नी असेल किंवा एखादा मित्र वा मैत्रीन असेल   जरी या पैकी कुणीही जवळचा नसलातरी सहज प्रवासात आसपास भेटलेल्या व्यक्ती जवळका होईना त्याने आपले मन मोकळे करायला हवे.   ही संधी जर त्यालामिळाली तर आत्महत्येची शक्यता ही टळते . यासाठी अचानक अबोला झालेल्या व्यक्तीच्या मना बाबतचा संशय चटकन जवळच्या व्यक्तीस यावयास हवा, जेणे करुन त्याला बोलते करता येईल.  एखाद्या व्यक्तीस जवळचा मीत्रही नाही अन जवळच्या कुटूंबातील सदस्यांनीही त्याचेशी संबंध तोडून टाकले आहेत अशा वेळी त्या व्यक्तीने नैराश्येच्या गगेऀत न जाता आपल्या आजूबाजूच्यासामान्य आसपासच्या गदीऀतील एखादा  मित्र बनविण्याचा प्रयत्न करुन आपलं मन मोकळ करावं .अन तेही जमत नसेल तर आपल्या मनाला कशात तरी गुंतविण्याचा प्रयत्न करावा  . एखादं काम हाती घ्यावंव मनात चाललेली चलबिचल ही थांबवावी . तेही जमत नसेल तर चक्क स्वतःला कोंडून घेवून आपल्याला जे वाटते ते, आपणावर झालेला अन्याय, आपल्यावर जवळच्याच आप्तांनी तोडलेले संबंध, किंवा आपल्या जीवनात घडलेल्या या सर्व  घटना ज्या आपणास आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करीत आल्यात त्या सा-या कागदावर  वा पत्रातून लिहून काढण्याचा प्रयत्न करावा.वाटल्यास ती पत्रे वा कागदे इतरांपासून दूर ठेवावीत.  आपले मन आपण निराश होऊ न देता त्याला नैराश्येच्या स्थितीतून सतत बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करावा .  यात काही काळ निघून जाईल व मनावर आत्महत्या करण्या विषयीचे जे एकाएकी दडपण आले होते त्याचा निचरा होईल . एकदा आत्महत्या करण्याचा अत्यूच्च असा विचारांचा जो क्षण असतो ना  तो टळला पाहिजे  ती वेळ निघून गेली की मग धेाका हा संपतो . 

              मध्यंतरीच्या काळात अध्यात्मिक गुरु भैयुजी महाराज , आनंदवनच्या समाजसेविका डाॅ शितल आमटे, डायरेक्टर नितीन देसाई, आखाड्याचे महंन्त यांच्या आत्महत्यांनी सारा समाज हळहळला.  ही माणसं शिकलेली होती.  ती समाजाला शिकवित होती.  कारण काहीहीअसो पण त्यांनी आत्महत्ये सारखे चुकीचे, आयुष्य संपवण्याचे पाऊल उचलले  हे टाळता आलं असंतं अन त्यांच पुढचं आयुष्यही समाजाला सुंदर बनविण्यासाठी वापरलं गेलं असतं.  त्या जर आत्महत्याच होत्या तर याला एकच कारण, त्यांच्या मनाचा कोंडमारा,   मनात सारं सारं कोंबलं गेलं,  मनातलं बाहेर काहीही निघू शकलं नाही.  मनावरचा हा ताणकमी करण्यासाठी त्यांनी बोलतं व्हायला हवं होतं  . ताण या शब्दावर माझे झोडग्याचे मित्र कवी कमलाकर आबा देसले यांनी आपल्या एक वृत्तपत्रीय सदरात खूप छान लिहिलं आहे तमाशाचा तंबू हा एका मध्यवतीऀ खांबावर आधारीत असतो. अन तो खांब जमीनीत गाडलेला नसून केवळ उभा केलेला असतो.  मात्र त्या खांबाने सरळ उभे रहावे व सारा तंबू तोलून धरावा या साठी त्या खांबांना अनेक ताण दिलेले असतात . उंच  भल्यामोठ्या या खांबाच्या चोहो बाजूने अनेक दो-यांचे ताण असतात. अन त्या ताणाचेही नियोजन असते, मॅनेजमेन्ट असते . तसं ताण हा जीवन उद्धस्त करीत असला तरी कुटूंबातील हा खांब मजबूत उभा रहावा यासाठी त्याच्यावरील विविध ताणांचे नियोजन, मॅनेजमेन्ट व्हायला हवे. 

                भैयुजी महाराजांच्या आत्महत्येवरील दूरदर्शनवरील चचेऀत त्यांचे मित्र अशोक वानखेडे यांनी  मानवीमनाचे सुंदर उदाहरण दिले होते .  तसंच सा-या आत्महत्येबाबत म्हणता येईल.  मनावर असलेला ताण, स्ट्रेस हा  कमी व्हायलाच हवा. व्यक्ती कीतीही मोठी असो, हुशार असो, शिकलेली असो मात्र तीही माणूसच असते . मन असते , मनावर ताण येतो  तो ताण अती होऊ नये या साठी त्याचा निचरा होणे आवश्यक असते.  त्या ताणाला आऊटलेट आवश्यक असते.  करोडो रुपये खर्चून मोठे धरण बांधले अन त्याला आऊटलेटच दिले नाहीतर पाण्याचा ताण वाढून ते धरण हे फूटणारच.   तसंलच कीतीही मोठी गुंतवणूक करुन समाजानेही मोठी माणसं उभी केली असतीेल तरी ती माणसंच आहेत .  त्यांनाही मन आहे , त्यामनावर ताण हा येणारच   अन त्या ताणाचा निचरा हा झालाच पाहिजे . त्या आऊटलेट हा हवाच   माणसाने आपलं मनाचं आऊटलेट सताड उघडं ठेवलं तर आत्महत्या या होणरच नाहीत . त्याने आपलं मन मित्राकडे,मैत्रिनीकडे, मुलांकडे, मंलीकडे, पती-पत्नी कडे , कुण्यातरी जवळच्या व्यक्तीकडे हे मोकळे केलेच पाहिजे.   असा कोणताही पयाऀय नसेल तर आपलं मन डायरी लिहीण्यात, आपल्या मनाच्या अवस्थेची कथा लिहीण्यात तरी गुंतवावं . अन अशा मनस्थितीतून बाहेर पडण्यासाठी नित्य - रुटीन- कामाहून वेगळ असं काहीतरी करीत स्वतःला गुंतवून घ्यावं.  बागकाम करा , आपला एखादा छंद जोपासा अन मनाची अवस्था बदला . सोशलमिडीयावर आपलं मनहलकं करा  आपलीं चूक किंवा काय असेल ते कुणाकडे तरी बोला. आपली जगण्या साठीची उजाऀ, ताकद , स्ट्रेन्थ परत मिळवा . कुणाशीही गप्पा मारा, हसा, बोला, रडा अन मनाचा बांध हा मोकळा करा  आपणही माणूसच आहोत अन माणसच चूका करतात  आपल्या हातून झालेली चूकही सुद्धा मानवी चूकच आहे.  त्यात काय एवढं मनाला लाऊन घेण्यासारख अशी मनाची समजूत काढा  आपल्या जवळच्या माणसाकडे,मनाकडे, देवळातल्या देवाकडे , अज्ञात शक्तीकडे, कागदावर आपली चूक मनोमन कबूल करा.  अन मनाचा निचरा झाल्यावर शांत रहा.  यासाठीच तर विपश्यना, मनन,चिंतन, ध्यान धरणा, योगा सूचविला जातो

              या व्यवस्थेमुळे स्वतःला मानसिकत्रास करुन घेण्याचीही हद्द असते  कधी कधी आयुष्यात वाईट प्रसंगांची मालिकाच सुरु होते  काही माणसं तर आयुष्यभर दुस-याच्या दुख-या जखमेवर सतत मीठ शिंपडण्यात सार्थक मानतात.  अशांनाही आपण ओळखलंच पाहिजे . कणखर असलेला माणूसही नैरास्येच्या खोल गगेऀत खचून जातो.  पुढे आत्महत्येच्या विचारांकडे मन झुकते.  यासाठीही इलाज आहे  आपण आत्महत्या करुन असेही मरणारच आहोत ना ? मग आपण मेलोच आहोत असं गृहित धरुन बेधडक जगा ना ! मानवाचा शेवट हा मरनानेच ठरलेला आहे, मग मनातील कींतू-परंतू नाहीसे होतील . ही अवस्था येणे एका दृष्टिने चांगलीही आहे.  या अवस्थेत एखादे असामान्य कृत्य, जे आपण करुच शकलो नसतो  ते सुद्धा आपल्या कडून सहज साध्य होते . ते आपणकसे केले याचेच आपणाला पुढे चालून आश्चर्य वाटते! ते आपणच केले की आपणाकडून एखाद्या अदृष्य शक्तीने ते करवून घेतले असा संभ्रमही निमाऀण होतेा  याला कारण आपण जेव्हा स्वतःला मेलोच आहोत असं गृहित धरतो किंवा जर मेल्यावर मातीच होणार असेल तर आजच मेलो आहोत असं गृहित धरुन चौकार षटकार मारीत जगलोत ,   माती होण्यापूवीऀ हे शरीर एखाद्या चांगल्या कामासाठी पुरेपूर वापरुन घ्या, ही मानसिकता आलेली असते . मग पहा मरण्या पेक्षा जगण्यात किती आनंद आहे ते ! इतर जे जगलेत त्याहून आपण खरे जगलोत अन आपणच खरा जीवनाचा आनंद घेतला हे लक्षात येईल  स्वतःसाठी जगतांना हातून विलक्षण असे कर्तत्व हे घडून येणारच !  जीवनहे आत्महत्या करुन संपविण्यासाठी नसते आपल्यातील सवोऀत्तम देण्यासाठी, सवोऀत्तम जगण्यासाठी असते.  जे जे आव्हानात्मक असेल ते ते  करण्यासाठी असते . आजवर ज्यांनी ज्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला अन आत्महत्येच्या काठावरुन ते कोणत्या ना कोणत्या कारणाने परत आलेत अन जीवन जगायला सुरुवात केली त्यांचे आयुष्य आत्महत्येचा विचार करण्यापूवीऀ वाचून पहा ! आत्महत्येच्या उंबरठ्यावरुन परत आलेल्यांचे जीवन पहा, ज्यांनी मरणापेक्षा जगणे स्विकारले त्यांचे जीवन वाचा.  तेही असंच  होत.    अन असं वेड््याचं जीवन जगतांना,जे स्वतःला स्वतःसाठी भरभरुन जगतात  ते पहा  

              माझं ऐका, तुम्ही आत्महत्या करु नका, असा हेका मी मुळीच करीत नाही.  मात्र आजूबाजूच्या परिस्थितीमुळे, आपल्यावर बितलेल्या प्रसंगामुळे जराही मनात विचार आलाच असेल आत्महत्येचा, तर आत्महत्या करण्यापूवीऀ वाचून पाहव्यात  विविध कथांसग्रहातीलपात्रांच्या कथा या पात्रांनी आयुष्याच्या कोणत्यावळणावर आत्महत्येचा विचार स्विकारला ! अन तो कसा चुकीचा होता.  ते या समाजाचे, प्रतिष्ठेचे, गैरसमजाचे, कसे बळीठरलेत ! आपणही आत्महत्येपूवीऀ असं काही वाचलच तर कदाचित  काही विचार आपणाला पटतीलही अन नेमकी हातातली वेळही गेलेली नसेल!

              

 कन्नडः दि 7मे 2023             

 डाॅ.रमेश सूर्यवंशी, अभ्यासिका कन्नड जिल्हा औरंगाबाद संपर्क 84 21 43 22 18

22 views0 comments

Recent Posts

See All

आई आणि मुलगी, तेव्हा आणि आता

लघुकथा म्हणण्यापेक्षा एक छोटासा अनुभव. शिकत असताना किंवा नोकरीवर असताना आई काही काही बांधून द्यायची. खायला लाडूच ने, चिवडा ने, चटणी ने...

Comments


bottom of page