औरंगाबाद जिल्ह्यातील दुर्लक्षित अशी पर्यटन स्थळे. भाग एक
डॉ.रमेश सूर्यवंशी
औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठाचा डोंगर ज्या मध्ये वेरूळ, अजंठा, पितळखोरा अशा अनेक लेण्या, जंजाळा वेताळवाडी असे अनेक किल्ले, धवलतीर्थ, केदाऱ्या, देवदार असे अनेक धबधबे, चंडिकादेवी, जोगेश्वरी, महेश्वर,अशी अनेक हेमाडपंती मंदिरे विखुरलेली आहेत. जैविक विविधतेने नटलेला गौताळा ऑट्रम् घाट अभयारण्य याच डोंगरात आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्याचे हे वैभव राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी आणि पर्यटन विभागाच्या उदासीनतेमुळे पर्यटकापासून कोसो दूरआहे. या परिसरातील पर्यटन वृद्धी करावयाची असेलतर वन खाते, वन्यजीव खाते, पुरातत्व विभागआणि पर्यटन विभागयांनी परस्परांच्या हातातहात घेऊन काम करायला हवे. पयऀटना बाबत राजकर्त्यांमध्ये आणि समाजामध्ये जागृती निर्माण करायला हवी. पुणे किंवा कोकण परिसरातील जे पर्यटन आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगल्या अवस्थेतील किल्ले धबधबे अभयारण्य या परिसरात आहे. हा परिसर पहावयाचा झाल्यास आपणाला औरंगाबादहून कन्नड किंवा सिल्लोड या तालुक्याच्या गावी यावे लागेल. कुठून यावयाचे झाल्यास औरंगाबाद साठी विमानसेवा आणि रेल्वेवाहतूक आहे. किंवा भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून जळगाव भुसावळ रेल्वेने येऊन सोयगाव किंवा चाळीसगाव या तालुक्याच्या गावी यावे लागेल. परिसर पहावयाचा झाल्यासआपणाला वर वर पाहण्यासाठी कमीत कमी चार दिवस पर्यटन करावे लागेल. अजिंठा डोंगर याला सह्याद्रीचा पर्वत असं म्हणतात.त्याची विंध्याद्री म्हणूनओळखली जाणारी ही डोंगररांग. स्थानिक लोक याला अजिंठ्याच्या डोंगर असे म्हणतात कारण याच डोंगरात पूर्वेकडे अजिंठा हे सुप्रसिद्ध अशी लेणी कोरलेली आहे. चला तरमग आपण या अजिंठा डोंगर परिसराचा फेरफटका मारून येऊ.
आपण जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून औरंगाबाद किंवा चाळीसगाव येऊ शकता. कन्नड किंवा चाळीसगाव या तालुक्याच्या गावात आला तर आपणाला पाटणादेवी,पितळखोरा या भागाचा पर्यटन करावं लागेल. हा परिसर पाहण्यासाठीआपल्याला दोन दिवसाचा अवधी लागेल. पाटणादेवी येथे पुरातन असं चंडिका
देवीमंदिर आहे. सुंदरअशा उंच डोंगराच्या पार्श्वभूमीवर उंच अशा दीप माळा असलेलं, उंच भव्य अशा चौथर्या वरचं हेमंदिर. भव्य अशीमूर्ती. बाजूला वाहणारी नदी. पाठीमागे कोसळणारा धवलतीर्थ हा फेसाळणारा उंचावरून कोसळणारा धबधबा आणि मंदिराच्या सभोवार खूप कोरीव काम केलेला मंदिराचा भाग काही शिलालेख. घनदाट असं अरण्य. हा परिसर सुद्धा अभयारण्य म्हणून सुरक्षित आहे. पूर्वी या परिसरात भास्कराचार्य चांगदेव नांदून गेलेत. त्यांच्या वेधशाळा अध्ययन व पठानाच्या शाळा याच परिसरात होत्या. या डोंगराच्या या इंग्रजी व्ही दरी मध्ये हे सार विस ला आहे. मंदिरापासून साधारणता तीन किलोमीटरअंतरावर
भव्य आणि सुंदर असा केदा-या धबधबा आहे. तर मंदिरामागचा जवळचा तो धवल तीर्थ धबधबा होय. संपूर्ण परिसर उंच अशा डोंगरांनी वेढलेला. धवल तीर्थ, धबधबा केदा-या धबधबा आणि चंडिकादेवी मंदिर पाहिल्या नंतर आपल्याला तेथील हल्ली नव्याने तयार झालेला हातीबंगला लीलावती बंगला आणि भास्कराचार्य कुटी ,प्रदर्शनी यांना भेटी देता येतील. या परिसरात बऱ्याच वनौषधींचे जतन केलेला आहे. या जंगलात खूप अशी चंदनाची झाड आहेत. घनदाट अभयारण्य असल्यामुळे या परिसरात पट्टेदार वाघाचे अस्तित्व सुद्धा आहे. बिबट, पट्टेदारवाघ, साऺबर, रुही किंवा नीलगाय, अस्वल, उद मांजर, खवले मांजर, यांचाही आढळ होतो. या परिसरात थांबण्यासाठी पर्यटन विभागाची डार्मेटरी आणि गेस्ट हाऊस आहेत मात्र याचं बुकिंग औरंगाबाद होत असतं आधी बुकिंग करा मग मुक्कामाला तिथे या असा हा उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार. त्यातल्या कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना त्यातल्या त्यात येथे बुकिंग करण्याची कुठलीही सोय नाही. म्हणजे पर्यटना बाबतची ही उदासीनताच म्हणावी लागेल. दुसरीबाब अशी की येथे मुक्कामाला थांबणाऱ्यांना जेवण हवं असेलतर ते चाळीसगाव बोलावं लागतं किंवा कुटुंबासह राहणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याला सांगावं लागतं. या परिसरात एक शिवमंदिर आहे, भव्य असा शिवमंदिर बराच मोठापरिसर या मंदिराच्या सभोवार आहे. भव्यसभामंडप कोरीव कामअसलेले खांब, छत आणि भिंती. आज गाभाऱ्यात शिवलिंगआहे. गाभाऱ्यात प्रवेशकरताना आजूबाजूच्या भिंतींवर मोठा असा शिलालेख कोरलेला आहे.
या मंदिराच्या मागे असलेला डोंगर चढून आपण गेला तर अर्ध्या वाटेत तुम्हाला लेण्या कोरलेल्या आढळतील त्या जैनलेण्या. या जैनलेण्या पाहून आपण वर गेलात तर वर कान्हेरगड हा किल्ला भव्य असा प्रवेशद्वार भव्य वस्तूंच्या भिंतींचे अवशेष बुरुज आपणाला पाहायला मिळेल. याच परिसरात डोंगरावर चिंध्या देव म्हणून प्रसिद्ध आहे. जेथून केदा-या धबधबा कोसळतो, त्याच्या वर मद्रासी बाबा म्हणून स्थान आहे. आजही अर्धे मंदिर जमिनीच्या आतुन कोरून काढलेलाआहे बाजूला नदी वाहते तीच पुढे धबधब्यात रूपांतरित होते ववरून खाली कोसळते. या चंडिका देवीच्या पाठीमागच्या डोंगरात गायमुख म्हणून एक क्षेत्र आहे. त्या क्षेत्राशी संबंधित सुद्धा काही दंतकथाआहे का प्रचलितआहेत आजूबाजूचा परिसरउंच डोंगरांनी वेढलेला आहे. काही काळत्या परिसरात एखाद्या साधू पुरुषाचं अस्तित्व असतं. असा हा पाटणादेवी परिसर धवलतीर्थ धबधबा , केदाऱ्या धबधबा, मद्रासी बाबा, गायमुख कानेर गड किल्ला, जैन लेण्या, चिंध्यादेव आणि अभयारण्याचा हा सारा परिसर जैव विविधता शांततेत भटकंती करायची तर दोनदिवस हवेत.
याच परिसरात वर चढून गेल्यावर पितळखोरा लेण्या आपणाला पाहता येतील. ज्यांना डोंगर शक्य आहेते पाटणादेवी पाहून चंडिका देवी मंदिरापासून पितळखोरा लेणीला वर चढू शकतात पायवाटेने पायी चढावे लागते. पितळखोरालेण्या या अजिंठाआणि वेरूळ या लेण्याच्या आधी कोरलेल्याआहेत. या लेण्यांचाकाळ इसवी सनपूर्व दुसरे शतकते इसवी सन सहाव्या शतक असा सांगितला जातो. याच परिसरात सापडलेल्या शहामृगाच्या अंड्यावरील कोरीवकाम यावर पुरातत्वविभागाचे शंकरांना साळी यांनी मानवाच्या वसाहतीचा इतिहास मांडला आहे. तशी यापाटणादेवी परिसरात खूप अशी जुन्या वास्तु पडझड झालेली मंदिरे यांची अवशेष आपणाला पाहायला मिळतात. जुन्या काळीपाटणा हे विद्यापीठच होते, शिक्षणाचे अध्यापनाचे अध्ययनाचे तपश्चर्येचे स्थान होते. या परिसरात या, थांबा, निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्या आणि मनशांती मिळवा.
या डोंगराच्यावर अंबाला हे आदिवासी ठाकर यांचं गाव. सर्व लोक आदिवासी ठाकर. त्यांची बोली, पोशाख, शेतीकरण्याची पद्धती, त्यांच्या काऺबड नाच, महिलांचे नृत्य, त्यांचे कृषी अवजारे, त्यांची घर बांधण्याचीपद्धती हे सारं सारं अभ्यासावयाचा असेल तर या वस्तीवर थांबावं लागेल. या वस्तीच्या बाजूला कळऺकी या गावापासून पेडक्या किल्ल्याला जाता येते. या पेडक्या किल्ल्यावर काही अवशेष शिल्लक आहेत पाण्याची कोरीव टाकी, तलाव, पाण्याच्या कोरीव टाकीतल्या छुप्याखोल्या हे पाहण्यासारखा आहे. कळलंकी या गावाहून एखाद्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मद्रासी बाबा , चिंध्या देवआणि पेडक्या किल्ला ही स्थळे पर्यटकांना पाहता येतील. आपल्याया पर्यटनातील अजिंठा डोंगराच्या पश्चिमेकडच्या टोकावर असलेल्या पर्यटनस्थळाचा आपण विचार केला भटकंती केली. पुढच्या भागात आपण या अजिंठा डोंगराच्या मधल्या टप्प्याचा विचार करू पर्यटन करू
डॉ.रमेशसूर्यवंशी
अभ्यासिका
वाणी मंगलकार्यालयासमोर
कन्नड
जिल्हा औरंगाबाद.
संपर्क 84 46 43 22 18
Comments